corona : दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू

1399 कोरोनामुक्त, १436 बाधित

Coronavirus

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला असून, बुधवारी (दि.2३) दिवसभरात १ हजार 399 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार 436 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण 582, नाशिक शहर 786, मालेगाव 55 आणि जिल्ह्याबाहेरील 13 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 20 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहर 7 आणि नाशिक ग्रामीणमधील १३ रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजवर ५7 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १३ हजार 898, नाशिक शहर 40 हजार ९96, मालेगाव २ हजार 810, जिल्ह्याबाहेरील २84 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ८ हजार ४40 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ३ हजार ३४0, नाशिक शहर ४ हजार 433, मालेगाव ५६5 आणि जिल्ह्याबाहेरील 102 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १ हजार ८०७ हून अधिक संशयित रुग्ण उपचारार्थ विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. त्यात जिल्हा रुग्णालय १९, नाशिक महापालिका रुग्णालय १ हजार 536, एमव्हीपी रुग्णालय 17, मालेगाव रुग्णालय २२, नाशिक ग्रामीण रुग्णालय २१३ रुग्ण दाखल झाले.