उद्योजक अतुल चांडक यांच्या घरातून तब्बल 23 लाखांची चोरी

रंगकाम करण्यासाठी आलेल्या कामगारांवर संशय

नाशिक : उद्योजक अतुल चांडक यांच्या बंगल्याच्या रंगकामासाठी आलेल्या दोन परप्रांतीय कामगारांनी कपाटातून 15 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे व साडेआठ लाखांची रोकड अशी एकूण २3 लाख 50 हजारांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गौरव अतुल चांडक यांनी मुंबई नाका पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संजय यादव (28, रा. नरोरा, ता. नरवल, जि. कानपूर नगर, उत्तर प्रदेश) व साहील मकसूद अहमद मन्सूरी (27, रा. गुठैया खैरा, तहसील बिंदकी, मुसाफा पोलीस चौकी. जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

उद्योजक चांडक यांचा तिडके कॉलनीत गौरव बंगला आहे. या बंगल्यात 27 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत रंगकाम सुरू होते. रंगकामासाठी दोन परप्रांतीय कामगार आले होते. चांडक कुटुंबियांचे लक्ष नसल्याची संधी साधत दोघांनी कपाटातून 15 लाख किंमतीचे 100 ग्रॅम वजनाचे तीन सोन्याची बिस्कीटे व साडेआठ लाखांची रोकड असा मुद्देमाल चोरल्याचा संशय चांडक कुंटुंबियांना आहे.