घरताज्या घडामोडीनाशकात 23 नवीन संशयित कोरोना रुग्ण दाखल 

नाशकात 23 नवीन संशयित कोरोना रुग्ण दाखल 

Subscribe

जिल्ह्यात दिवसेंदिवस संशयित कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. मंगळवारी (दि.7) 23 संशयित कोरोना रुग्ण जिल्हा रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व सामान्य रुग्णालय मालेगाव येथे दाखल झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. जिल्हा रुग्णालयास 27 पैकी 13 जणांचे रिपोर्ट मिळाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.

नाशिकमध्ये दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा खबरदारी घेत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले नातलग व नागरिक 19 आहेत. ते सर्वजण आरोग्य विभागाच्या निगराणी खालीआहेत. आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत होम क्वारंटाईन असलेल्या 259 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. सोमवारी (दि.6) पुणे राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत 27 संशयित रुग्णांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 13 रिपोर्ट मंगळवारी जिल्हा रुग्णालयास मिळाले असून ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित रिपोर्ट रात्री उशिरापर्यंत येणार आहेत. शहरातील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या मनोहरनगर, गोविंदनगर परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागातर्फे 210 खाटांची व्यवस्था

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फ जिल्हाभर 210 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात 100, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 70, सामान्य रुग्णालय मालेगावात 20, उपजिल्हा रुग्णालयात 20 खाटांची व्यवस्था आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, सुरक्षा साधन संच (किट), मल्टीपॅरामॉनिटर्स व तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात आहे.

नाशिक कोरोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण 02

- Advertisement -

निगेटिव्ह रुग्ण 232

मंगळवारी दाखल झालेले रुग्ण 23

प्रलंबित रिपोर्ट 14

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -