नाशिक : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१८) दिवसभरात २ हजार ५८९ नवे रुग्ण बाधित आढळून आले. त्यात नाशिक शहर १ हजार ५७६, नाशिक ग्रामीण ८८१, मालेगाव ३४ आणि जिल्ह्याबाहेरील ९८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात २ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात १२ हजार ७५९ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात १ हजार ३७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. नाशिक शहरातील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याच दिसतय. परंतू रूग्णवाढीचा दर वाढत असला तरी रूग्ण बरे होण्याच प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -