घरमहाराष्ट्रनाशिक२८ पोलिस कर्मचारी बनले पी.एस.आय

२८ पोलिस कर्मचारी बनले पी.एस.आय

Subscribe

नाशिक ग्रामीण पोलीस दलाची उंचावली मान

सदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रीदवाक्याला अनुसरून नव्याने पदोन्नती मिळालेले २८ पोलीस कर्मचारी हे सेवा ज्येष्ठतेनुसार उपनिरीक्षक झाले आहेत. पूर्वीचा त्यांच्याकडे असलेला कामकाजाचा अनुभव बघता अधिकारी म्हणून नव्याने ते कर्तव्य बजावत असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलाची मान उंच ठेवतील असा विश्वास आहे.

पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा २०१३ मधील पात्र असलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील २८ पोलीस हवालदारांना सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. याप्रसंगी सर्व पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकार्‍यांचे स्वागत व सत्कार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.या प्रसंगी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सत्कारार्थी यांना खांद्यावर स्टार व फित लावत पुष्पगुच्छ देऊन पुढील सेवेला शुभेच्छा देत सन्मानित केले.या प्रसंगी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पदोन्नती झालेले पोलीस उपनिरीक्षक

प्रमोद आव्हाड, दिलीप गांगुर्डे, प्रकाश गडाख, राजू सूर्यवंशी, युवराज साळवे, दगु सोनवणे, प्रकाश चव्हाणके, राजाराम दिवटे, कैलास देशमुख, दत्तात्रय साबळे, अशोक मोकळ, उत्तम शिंदे, संजय गांगुर्डे, चंद्रकांत दवंगे, मछिंद्र पठाडे, उदयसिंग मोहारे, विजय गायकवाड, चंद्रभान जाधव, कैलास कपिले, बाळू वाघ, अशोक कदम, रावसाहेब त्रिभुवन, विजय सोनवणे, निवृत्ती खोडे, प्रकाश गवळी, रामराव वाघ, दिलीप बोडके, कैलास दरगुडे यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -