नाशिक कोरोना अपडेट : २९९९ नवे पॉझिटिव्ह

१४१०४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

corona

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.१९) दोन हजार ९९९ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर १ हजार ९१६, नाशिक ग्रामीण ८६८, मालेगाव १०३ आणि जिल्ह्याबाहेरील ११२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १ हजार ६५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण ४ लाख ३९ हजार ७८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख १६ हजार २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ८ हजार ७७३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक ४ हजार २४३ रुग्ण नाशिक जिल्ह्यातील असून, ४ हजार ३५ रुग्ण नाशिक शहरातील आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहर १० हजार १६९, नाशिक ग्रामीण ३ हजार ३७०, मालेगाव २९१ आणि जिल्ह्याबाहेरील २७३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ४४.४ टक्के आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व नागरिकांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार तब्बल ३ हजार ५५२ संशयित रुग्णांनी कोरोना तपासणी केली आहे. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक शहर ६०४, नाशिक ग्रामीण २ हजार ७७१ आणि मालेगावमधील १७७ रुग्णांचा समावेश आहे.