घरमहाराष्ट्रनाशिककारचा टायर फुटल्याने तीन जागीच ठार, दोघे जखमी

कारचा टायर फुटल्याने तीन जागीच ठार, दोघे जखमी

Subscribe

नाशिक मुंबई महामार्गावरील प्रभू धाब्यासमोर घडली घटना

नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभू धाब्यासमोर इनोव्हा कारचा टायर फुटल्याने भरधाव ट्रकवर आदळल्याने तीन जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

नाशिक येथील पाच जण मुंबईकडून आपले काम आटोपून इनोव्हा कारने (एमएच-१५-डीसी-७१६०) नाशिककडे रात्री परतत होते. पहाटे दोनच्या दरम्यान ही कार गोंदेदुमाला जवळ प्रभू धाब्यासमोर आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे कार दुभाजक ओलांडून नाशिककडून मुंबईकडे जाणार्‍या ट्रकवर (एमपी-०९-एचएच-७६५९) आदळली. यामुळे इनोव्हा कारचा चक्काचूर झाला.

- Advertisement -

कारमधील रोहित शिवाजी पवार (वय २७), प्रफुल्ल धनंजय प्रभू (वय २२, दोघे रा.अभिमन्यू सोसायटी शिंगाडा तलावाजवळ नाशिक), दानिश जनाउद्दीन सिद्दिकी (वय २२ रा. शंकरनगर, द्वारका) हे तिघे जागीच ठार झाले, तर चालक साहिल दिनेश रावल व गणेश (बंटी) अनिल पवार हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका आणि घोटी टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेने तत्काळ जखमींना रुग्णालयात हलविले. यावेळी पोलीस उपअधीक्षक राणे आणि निरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना मदत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -