नाशिकमध्ये ३ ठिकाणी चोरी

नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ३ चोऱ्या झाल्या आहेत. यामध्ये घरफोडी, मोबाईल चोरी आणि रिक्षा चोरीची घटना घडली आहे.

Terror of Chowk thieves in Khalapur
Khalapur : महिलेचे हात बांधून घर केले साफ ; चोरट्यांची चौकमध्ये दहशत

नाशिकमध्ये तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. एके ठिकाणी घरफोडी झाली आहे. दुसरीकडे मोबाईल हिसकावण्याची घटना तर तिसऱ्या ठिकाणी चक्क रिक्षा चोरीला गेली आहे. २० ते २८ डिसेंबर या कालावधीत तीन ठिकाणी चोरी झाल्या असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  विस्तृत घटना पुढीलप्रमाणे…

घरफोडी

नाशिक येथील आडगाव शिवारात शुक्रवारी संध्याकाळी यमुनाबाई गोसावी यांच्या घरी चोरी झाली. घरी कोणी नसल्याचे पाहून गोसावी यांच्या घरातील वरच्या मजल्यावर असलेले कपाट व शोकेसमधून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ,पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, चांदीची देवीची मुर्ती, चांदीची चेन असा ३८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. संध्याकाळी ५.३० दरम्यान दोघे पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा वरुन आले. या दोघा संशयितांनी गोसावी यांच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तरुणाचा मोबाइल खेचला

दुसरी घटना नाशिक रोडकडून हॉलमार्क चौकाकडे घडली. तरुणाचा मोबाईल हातातून खेचण्यात आला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र देसले (२१) हा तरुण रात्री साडेदहावाजण्याच्या सुमारास घराकडून हॉलमार्क चौकाकडे पायी जाताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा संशयितांनी त्याच्याकडील फोन खेचून घेतला.

रिक्षा चोरीला

तर तिसरी चोरी ही नाशिक परिसरातील पांडवनगरीत झाली असून चोराने चक्क ८० हजार रुपयांची ऑटोरिक्षा चोरून नेली. युवराज देवीदास दिवे ) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या २० तारखेच्या मध्यरात्री द्रोणाचार्य अपार्टमेंटजवळ पार्क केलेली ८० हजार रुपयांची ऑटो रिक्षा (एमएच १५ ईएच २९४५) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.