घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकेश्वरसाठी 300 जादा बसेस

त्र्यंबकेश्वरसाठी 300 जादा बसेस

Subscribe

तिसरा श्रावणी सोमवार : एसटीचे नियोजन, यंदा प्रथमच सिडकोतूनही फेर्‍या

तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी फेरीसाठी जाणार्‍या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे 300 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या गाड्या ईदगाह मैदान येथून रविवारी (दि.18) सकाळी 8 वाजेपासून सुटणार आहेत. यंदा आगार क्रमांक दोनच्या तीन प्रायोगिक फेर्‍या सिडको ते त्र्यंबकेश्वर दरम्यान सोडण्यात येणात आहेत.

एसटी महामंडळाने सिडकोतून शिवाजी चौक, विजयनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक मार्गे त्र्यंबकसाठी जादा बसेस प्रायोगिक तत्वावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ईदगाह मैदान येथून सुटणार्‍या बसेस या राजदूत हॉटेलजवळील गेटमधून बाहेर पडून जलतरण तलाव सिग्नलमार्गे त्र्यंबककडे जाणार आहेत. तर त्र्यंबककडून येणार्‍या गाड्या भवानी सर्कल येथून उजव्या बाजूने वळून चांडक सर्कल येथून ईदगाह मैदानाच्या मागील दरवाजाने परत येणार आहेत. तिसर्‍या श्रावणी सोमवारच्या फेरीला असलेले विशेष महत्त्व लक्षात घेता नाशिक विभाग गतवर्षाच्या तुलनेत यंदा 25 अधिक गाड्या अधिक सोडणार आहे. नाशिक आगार क्रमांक 1 च्या 75 जादा गाड्या त्र्यंबककडे जाणार आहेत. मालेगाव आगाराच्या 16 बस ईदगाह मैदानावरून, सटाणा डेपोच्या 16 गाड्या, येवला 12, सिन्नर 15, कळवण 16, नांदगाव 8, पिंपळगाव बसवंत 6, तर लासलगावहून 12 गाड्या जादा गाड्यांचे नियोजन आहे.

- Advertisement -

एसटीने गाड्यांचे नियोजन करताना 9 मार्ग निश्चित करून त्यात जादा 300 गाड्या सोडण्याचे ठरविले आहेत. त्यापैकी नाशिक ते त्र्यंबक या मार्गावर 170 गाड्या धावणार आहेत. निमाणी बसस्थानक ते त्र्यंबक मार्गावर आगार क्रमांक दोनच्या 21 गाड्या, तर नाशिकरोडहूनही 21 गाड्या धावतील. सातपूर बसस्थानकातूनही 16 गाड्या असतील. तसेच अंबोली ते त्र्यंबक मार्गावर पेठ डेपोच्या 8 गाड्या, पहिने ते त्र्यंबक मार्गावर इगतपुरी डेपोच्या 10 गाड्या, घोटी ते त्र्यंबक मार्गावर 9 गाड्या आणि खंबाळे ते त्र्यंबक मार्गावर मनमाड, पिंपळगाव बसवंत, मालेगाव आगारांच्या मिळून 39 गाड्या धावतील.

जादा गाड्यांचे मार्ग नियोजन

मार्ग बसेस

नाशिक-त्र्यंबक 170
अंबोली-त्र्यंबक 09
सातपूर-त्र्यंबक 16
ना.रोड-त्र्यंबक 23
निमाणी-त्र्यंबक 23
पहिने-त्र्यंबक 09
घोटी-त्र्यंबक 10
खंबाळे-त्र्यंबक 40

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -