Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक वटपौर्णिमेनिमित्त ३ हजार वृक्षरोपणाची मोहीम

वटपौर्णिमेनिमित्त ३ हजार वृक्षरोपणाची मोहीम

भाजपमधील पर्यावरणप्रेमी महिलांचा पुढाकार, नंदिनी नदीकाठी लागवड

Related Story

- Advertisement -

नंदिनी नदी पुनरुज्जीवन आणि संवर्धन अभियानांंतर्गत वटसावित्री पोर्णिमेच्या मुहूर्तावर भाजपमधील पर्यावरणप्रेमी महिलांनी नंदिनी नदीकाठी तब्बल ३ हजार वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली. पर्यावरणप्रेमींनी नंदिनी नदीला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी नंदिनी नदीच्या दोन्ही बाजूने ही झाडे लावण्यास प्रारंभ केला. नंदिनी नदीच्या तळेगाव (अंजनेरी) येथील उगमस्थानापासून ते टाकळी येथील संगमस्थानापर्यंत दुतर्फा पर्यावरणप्रेमींसह पर्यावरणासाठी कार्यरत संस्था आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदूषणमुक्त नंदिनीसाठी ही मोहीम प्रभावी ठरणार आहे. भाजप पर्यावरण मंच, शहरातील एनजीओ, शहर आणि परिसरातील असंख्य पर्यावरण प्रेमी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. महिरावणी, पिंपळगाव बहुला ते टाकळीदरम्यान महापालिकेच्या व पर्यावरणप्रेमी स्वयंसेवक, भाजप पर्यावरण मंच यांच्या माध्यमातून प्रथम टप्प्यात नंदिनी नदीला कचरा व प्रदूषणमुक्त करण्यासाठी वेगाने काम सुरू असल्याची माहिती नंदिनी नदी पुनरज्जीवन व संवर्धन अभियान प्रमुख तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी दिली. हा उपक्रम संपूर्ण देशभरात आदर्श ठरेल व देशभरातील पर्यावरण तज्ज्ञ प्रदूषण मुक्त नंदिनी बघायला येतील, असा विश्वासही सावजी यांनी व्यक्त केला.

या मोहीमेच्या यशस्वीतेसाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, आमदार सीमा हिरे, नाशिक महानगर पर्यावरण मंच संयोजक उदय थोरात, दिनकर पाटील, रवींद्र ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती महिला मंडळ, ग्रेस अकॅडमी, रुपाली मर्चंडे, शिल्पा पारनेरकर, डॉ. वर्षा भालेराव, पूर्वा सावजी, रश्मी हिरे बेंडाळे आदी प्रयत्नशील आहेत.

वृक्षारोपणासाठी ३००० रोपट्यांचे प्रायोजकत्व

- Advertisement -

योग आणि अ‍ॅक्युपंक्चर शैक्षणिक आणि संशोधन संस्था संस्थेचे योग शिक्षक सुधीर सोमय्या, सुचेता गुजराथी, अरुण एकबोटे बालकृष्ण आहेर, पंकज शाह, विपुल मेहता यांनी भाजपच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मोहीमेसाठी रोपट्यांचे प्रायोजकत्व दिले आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमात नितीन गायकर, दत्तू ढगे, अमित बोकड, पवन भगूरकर, जगन अण्णा पाटील, सुनील केदार, भास्कर घोडेकर, सुनील देसाई, देवदत्त जोशी, शिवाजी बरके, अविनाश पाटील, अमोल इगे, भगवान काकड, रामहरी संभेराव, चारुदत्त आहेर, समाधान खांडबहाले , नितीन खंडबहाले आदी उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -