Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक पूरग्रस्त भागातील मदतनिसांसाठी ३० हजार अंडी

पूरग्रस्त भागातील मदतनिसांसाठी ३० हजार अंडी

कडकनाथ अ‍ॅग्रो वर्ल्ड संस्थेचा अभिनव प्रयत्न; सैन्यदल, पोलिसांना केले जाणार वितरण

Related Story

- Advertisement -

पूरग्रस्तांना देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे; परंतु पूरग्रस्तांना मदत करणार्‍यांत उर्जा संचारण्यासाठी आणि पूरपरिस्थितीत त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी कडकनाथ अ‍ॅग्रो वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून नाशिकमधून तब्बल ३० हजार कडकनाथची अंडी पाठवण्यात आली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या प्रलयकारी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. २००५ नंतर पहिल्यांदाच इतकी अतिवृष्टी झाल्यामुळे कल्पनेच्या पलीकडे जीवित व वित्तहानी झाली. लाखो नागरिकांना आपली घरे सोडून मदत शिबिरामध्ये आश्रयाला जावे लागत आहे. पश्चिम महाराष्ट्राला या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी सैन्य दल (एनडीआरएफ), पोलीस प्रशासन, सेवाभावी संस्था अहोरात्र काम करीत आहेत. या कामाला प्रोत्साहन मिळावे म्हणून नाशिकमधील उद्योजक संदीप दिनेश सोनवणे यांनी आपल्या कडकनाथ ऍग्रो वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबवायचे ठरवले.

- Advertisement -

देशात व परदेशात निर्यात होत असलेली कडकनाथ प्रोटीनयुक्त अंडी व्यवसायातील नफा दुर्लक्षित करून त्यांनी सैन्य दल व पोलीस दलातील जवानांना देण्याचे ठरवले. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालय व कोल्हापुरातील विशिष्ट अधिकार्‍यांशी चर्चा करून कॅनडा कॉर्नर येथील कडकनाथच्या मुख्य वितरण केंद्रातून वाटपाचे नियोजन करून तातडीने रवाना केले. विशेष पथकासोबत ही अंडी कोल्हापूरला पाठवण्यात आली. या पथकात प्रशांत गुजराथी, प्रीतम भट, अभिजीत इंगोले, संदीप पंचभाई, सुदाम राठोड, भानुदास महाले व दिलीप राठोड यांचा समावेश आहे.

कडकनाथचीच अंडी का?

  • कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.
  • हार्ट अटॅक व डोके दुखीवर गुणकारी.
  • दमा, अस्तमा, टीबी या आजारावरही गुणकारी
  • प्रोटीन आणि लोहचे प्रमाण 25-70टक्के
  • अंडी डायट अंडी म्हणूनही खाल्ली जातात
  • मांसामध्ये प्रथिनांचे प्रमान अधिक
  • स्त्रियांच्या पाळीत नियमीतता येण्यास येण्यास मदत होते.
- Advertisement -