घरताज्या घडामोडीजिल्हा बँकेतर्फे 32 लाखांची मदत

जिल्हा बँकेतर्फे 32 लाखांची मदत

Subscribe

पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस सहाय्य; जिल्हाधिकार्‍यांकडे धनादेश सुपुर्द

नाशिक : करोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सहायता निधी देण्याचे आवाहन केले आहे. त्यास नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी प्रतिसाद देत एकूण 32 लाख रुपयांची भरीव मदत केली. यात बँकेतील कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन म्हणजेच 15 लाख रुपयांचा समावेश आहे.
पंतप्रधान सहायता निधीस 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीस 21 लाख रुपयांचा धनादेश मंगळवारी (दि.5) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ संचालक गणपत पाटील, माजी राज्यमंत्री डॉ.शोभा बच्छाव, परवेज कोकणी, संदिप गुळवे, नामदेव हलकंदर व मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश खरे यांसह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा बँकेची मासिक सभा 30 एप्रिल रोजी झाली. यात ठराव क्र.9 मंजूर करत कोविड 19 (करोना)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्तिचे प्रयत्न केले जात आहेत. करोनामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारणे व करोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा बँकेनी आर्थिक मदत करण्याचे ठरविले. यात कर्मचारीही सहभागी झाले असून त्यांनी एक दिवसाचे वेतन 15 लाख चार हजार 414 रुपयांची मदत केली. उर्वरीत रक्कम बँकेनी भरत दोन्ही धनादेश जिल्हाधिकार्‍यांकडे सुपुर्द केले. जिल्हा बँकेच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -