घरमहाराष्ट्रनाशिक३२९ कर्जधारकांचा ताण मिटला; लोकअदालत मधून लागला कोट्यावधीचा निकाल

३२९ कर्जधारकांचा ताण मिटला; लोकअदालत मधून लागला कोट्यावधीचा निकाल

Subscribe

नाशिक : नाशिक रोड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व वर्गवारीतील ठेवण्यात आलेल्या चार हजार ७६५ प्रकरणांपैकी ३२९ प्रकरणे तडजोडीअंती रविवारी (ता. ३०) निकाली काढण्यात यंत्रणेला यश मिळाले. निकाली निघालेल्या दाव्यांतून ३ कोटी २४ लाख ७० हजार ६६४ रुपये इतका महसूल मिळालेला आहे.

नाशिक रोड दिवाणी व फौजदारी तसेच मोटार वाहन न्यायालय, विधी प्राधिकरण नाशिक, नाशिक रोड वकील संघातर्फे नाशिकरोड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात पॅनल क्रमांक १ मध्ये न्या. शर्वरी एस. जोशी, पॅनल मेंबर अ‍ॅड. अविनाश भोसले, पॅनल क्रमांक २ मध्ये न्या. ए. एन. सरक, पॅनल मेंबर अ‍ॅड. प्रतीक मालपाणी यांनी कामकाज पाहिले. यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात एकूण तीन हजार ८२७ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

त्यापैकी १८१ प्रकरणे निकाली निघून ३ कोटी ११ लाख ६८ हजार ९७७ रुपये इतका महसूल प्राप्त झाला. तर मोटार वाहन न्यायालयातील ८२३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १४१ प्रकरणे निकाली निघून ७ लाख २३ हजार ६०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तसेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट कलम १३८ अन्वये ११५ प्रकरणांपैकी ७ प्रकरणे निकाली निघून ५ लाख ७८ हजार ८७ रुपये महसूल प्राप्त झाला. या राष्ट्रीय लोक अदालतीच्या कामकाजासाठी नाशिक रोड वकील संघाचे अ‍ॅड. सुनील शितोळे, अ‍ॅड. उमेश साठे, अ‍ॅड. मनीषा बेदरकर, अ‍ॅड. प्रमोद कासार, अ‍ॅड. गणेश मानकर, अ‍ॅड. आनंद भोसले, अ‍ॅड. प्रिया बावीस्कर, अ‍ॅड. कुलदीप यादव, अ‍ॅड. एकता आहुजा, सहाय्यक अधीक्षक डी. आर. वैद्य, ए. एन. बागूल, मनोज मंडाले, रणशेवरे व इतर कर्मचारी तसेच शहर वाहतूक पोलिस आदींचे न्याय यंत्रणेला सहकार्य लाभले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -