घरमहाराष्ट्रनाशिक३४ हॉस्पिटल्सची पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली

३४ हॉस्पिटल्सची पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त बिलाची वसुली केल्याच्या तक्रारी प्राप्त

 कोरोनाबाधित रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त बिलाची वसुली केलेल्या तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित ५७ रुग्णालयांना महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. यात त्यांच्याकडून तपासणीसाठी बिलांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी २३ रुग्णालयांनी रुग्णांची बिले तपासणीसाठी दिली असून उर्वरित ३४ रुग्णालयांनी महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे. महापालिकेच्या वतीने आता संबंधितांना पुन्हा नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच बिलांची आकारणी करण्यात यावी, अशा सूचना शहरातील सर्वच कोविड रुग्णालयांना देण्यात आल्या होत्या. काही हॉस्पिटलनी मात्र अव्वाच्या सव्वा बिले आकारणे सुरुच ठेवले होते. नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने लेखापरीक्षण विभागाच्या शिफारशीनुसार शहरातील ५७ रुग्णालयांना नोटिसा पाठविल्या होत्या. रुग्णावर करण्यात आलेले उपचार, शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे ८० टक्के बेड उपलब्ध करुन दिले होते का, तसेच बिलांची आकारणी कशी केली, याबाबत संबंधित रुग्णालयांना विचारणा करण्यात आली आहे. या ५७ पैकी २३ रुग्णालयांनी लेखापरीक्षण विभागाकडे बिले सादर केली आहेत. त्या बिलांची तपासणी करण्यात येत असून आढळलेल्या तफावतीनुसार काही रुग्णालयांनी बिलाची जादा रक्कम संबंधित रुग्णांना परत दिली आहे. उर्वरित बिलांची तपासणी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -