स्टेट बँकेत हातचलाखीने लंपास केले ३४ हजार

हातचलाखीने ३४ हजार लंपास, आडगाव नाका येथील घटना

बंडलमध्ये बनावट नोटा असल्याची बतावणी करत चोरट्यांनी हातचलाखीने कर्जदाराचे ३४ हजार रुपये लंपास केल्याची घटना आडगाव नाका येथील बँक ऑफ इंडियामध्ये घडली. याप्रकरणी संतोषदेवी नांगलिया (वय ५०) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नांगलिया या बँकेत कर्ज काढण्यासाठी आले होते. कॅशियरने त्यांना ३४ हजार रुपये दिले. त्यावेळी अनोळखी दोन तरुणांनी त्यांना नोटा तपासून घ्या. बंडलमध्ये काही बनावट असतात, असे सांगत नोटा तपासणी सुरु केली. हातचलाखीने दोघांनी ३४ हजार रुपये लंपास केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर करत आहेत.