घरताज्या घडामोडीट्रकमधून प्रवास करणारे 37 परप्रांतीय कामगार ताब्यात

ट्रकमधून प्रवास करणारे 37 परप्रांतीय कामगार ताब्यात

Subscribe

नाशिक-धुळे महामार्गावर दहाव्या मैलानजीक दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन ३७ व्यक्तींची वाहतुक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. चौकशी केली असता ट्रकमधील सर्व व्यक्ती उत्तर प्रदेशातील मुळ रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी ३७ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

परप्रांतीय कामगार मुंबईहून उत्तर प्रदेशकडे पायी जात असतांना त्यांनी रस्त्यात ट्रकला हात दिला व ट्रकमध्ये बसल्याचे प्रवाशांनी सांगीतले. याप्रकरणी मध्यप्रदेशातील चालक मुकेश विपनसिंग याच्यासह उत्तर प्रदेशातील ३७ व्यक्तींना ताब्यात घेतले. सर्वांची प्राथमिक आरोग्य तपासणी केल्यानंतर सर्वांना तहसीलदार कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वणी येथील महाविद्यालय इमारतीत हलविण्यात येऊन क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, तात्काळ अमझिरा संखेश्वर ट्रस्टच्या वतीने सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. याप्रकरणी दिंडोरी पोलीस येथे वाहन चालक व मालका विरुद्ध गुन्हा नोंदवीण्यात आला असुन पुढील तपास पो.नि. अनिल बोरसेे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -