घरताज्या घडामोडीपेठ-नाशिक रोडवर मध्यरात्री ४ लाखांच्या मद्याची वाहतूक

पेठ-नाशिक रोडवर मध्यरात्री ४ लाखांच्या मद्याची वाहतूक

Subscribe

गुजरातमधील कारचालकाला अटक; ‘एक्साईज’च्या दिंडोरी पथक क्रमांक तीनची कारवाई

केंद्रशासित प्रदेशनिर्मीत मद्याची अवैध वाहतूक नाशिक जिल्ह्यातून केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. गुरुवारी (दि.१५) मध्यरात्री अवैधरित्या मद्याची वाहतूक करणार्‍या कारचालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने पेठ ते नाशिक रोडवरील सावळघाट इनामबारी शिवारात सापळा रचून अटक केली. त्याच्या ताब्यातून कारसह चार लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. दिलीपभाई मोतीसिंग वसावा (३३, रा.टेकरा फलिया जि.भुरूच, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहेत.

पेठ रोडमार्गे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ,अधिक्षक डॉ. मनोहर अंचुळे आणि उपअधिक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि.१५) मध्यरात्री इनामबारी शिवारात सापळा लावण्यात आला. पथकाने भरधाव येणार्‍या इको कार (जीजे ०६ एचएल ९६५५) अडवली. चालकास ताब्यात घेत पथकाने वाहन तपासणी केली असता कारमध्ये ब्लेण्डर प्राईड, रॉयल चॅलेंज, मॅजिक मोमेट ओडका असा मद्यसाठा मिळून आला. पथकाने कारसह सुमारे ४ लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक बागुल करत आहेत.

- Advertisement -

ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस. बी. शिंदे, जवान विष्णू सानप, एस. एस. पानसरे, व्ही. ए. चव्हाण, व्ही. बी. पाटील, एस. एस. भांगरे, एम. पी. भोये व वाहनचालक एम.ए.खामकर यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -