घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये जलकुंभाची भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू

नाशिकमध्ये जलकुंभाची भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू

Subscribe

पाथर्डी फाटा परिसरातील अमृत नगर भागातील दुर्घटना, दोन वर्ष वयाचा भाऊ सुदैवाने बचावले

नवीन नाशिक –  पाथर्डी फाटा परिसरातील अमृत नगर भागात जलकुंभाची भिंत अंगावर कोसळून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आरसी परविन जमिल अख्तर असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तर कुटुंब मूळचे बिहारमधील असून, उदरनिर्वाहासाठी ते पाथर्डी फाटा येथे वास्तव्यास आहेत. आरसीचे वडील एका खासगी कंपनीचे कर्मचारी आहेत. आरसी व तिचा दोन वर्षीय भाऊ आईसोबत पाण्याच्या टाकीजवळ ब्रश करत होते. त्यावेळी अचानक पाण्याच्या टाकीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत आरसी व तिचा दोन वर्षाचा भाऊ भिंतीखाली दाबले गेले. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांना लहान भावाला बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, आरसी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारार्थ नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -