घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेत ४० कर्मचारी ‘लेटलतिफ’

जिल्हा परिषदेत ४० कर्मचारी ‘लेटलतिफ’

Subscribe

या कर्मचार्‍यांना बजावली विना वेतन नोटीस

नाशिक : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.६) अचानक मुख्यालयातील अनेक विभागांना भेट दिली. यात तब्बल ४० कर्मचारी लेटलतिफ आढळले आहे. या कर्मचार्‍यांना विना वेतन नोटीस बजावण्यात आली आहे.
अध्यक्ष क्षीरसागर यांचे सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेत आगमन झाले. आगमन झाल्यानंतर अध्यक्ष कार्यालयात जाण्याऐवजी थेट आरोग्य विभागात ते पोहचले. यावेळी अध्यक्ष क्षीरसागर यांनी कर्मचार्‍यांची हजेरी घेतली, हजेरी मस्टर बोलावून घेत पाहणी केली. त्यानंतर बांधकाम विभाग दोन, तीन, शिक्षण, बांधकाम विभाग क्र. एक, ग्रामपंचायत, पाणी पुरवठा व स्वच्छता, लेखा व वित्त विभाग, सामान्य प्रशासन, कृषी विभागांना भेटी दिल्या. वेगवेगळ्या विभागांतील कर्मचार्‍यांना नोटिस बजावली.

विभागनिहाय उशिरा आलेले कर्मचारी

  • आरोग्य विभाग (८)
  • पशुसवंर्धन विभाग (२)
  • समाजकल्याण विभाग (१)
  • लघुपाटबंधारे पश्चिम विभाग (३)
  • बाँधकाम विभाग २ (८)
  • पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग (५)
  • बांधकाम विभाग क्रमांक ३ (८)
  • कृषी विभाग (५)
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -