घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक, दिंडोरीतून पहिल्या दिवशी ४९ अर्ज

नाशिक, दिंडोरीतून पहिल्या दिवशी ४९ अर्ज

Subscribe

भुजबळांव्यतिरिक्त प्रमुख उमेदवारांनी नेले

नाशिक लोकसभेसाठी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी नाशिक मतदारसंघातून भुजबळांव्यतिरिक्त ३० इच्छुकांनी अर्ज नेले तर दिंडोरी मतदारसंघासाठी दहा इच्छुकांनी १९ अर्ज नेले. यात नाशिकसाठी अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी भाजपाकडून अर्ज नेल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे, तर दिंडोरीत विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

नाशिकच्या निवडणूक रणधुमाळीला खर्‍या अर्थाने आजपासून सुरुवात झाली. प्रमुख पक्षाने आपले उमेदवार जाहीर करत प्रचाराला सुरुवातही केली. आजपासून निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकच्या रणसंग्रामात भुजबळ विरुद्ध गोडसे, अशी प्रमुख लढत होणार असल्याचे बोलले जात असले, तरी भाजपचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनीही दिल्लीत तोरण बांधण्याचा निर्धार व्यक्त केल्याने त्यांच्याही भूमिकेकडे लक्ष लागले आहे. नाशिकमधून अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी भाजपच्या नावाने अर्ज घेतला असला तरी येथे युती असल्याने त्यांना पक्षातर्फे एबी फॉर्म मिळणे शक्य नाही. तरीही भाजपच्या मतदारांसाठी त्यांनी आपण भाजपचे उमेदवार असल्याचे दाखवणे हा यामागील हेतु असल्याचे समजते. दिंडोरीचे भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट करत राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली.

- Advertisement -

यापूर्वी डॉ. पवार यांनी दोनवेळा या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी केली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, भाजपाने डॉ. पवार यांना उमेदवारी दिल्याने चव्हाण नाराज आहेत. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली असली, तरी त्यांना राज्यसभेचे गाजर दाखवून राष्ट्रवादीचा प्रचार करण्याची ऑफर देण्यात आल्याचे समजते. माकपचे आमदार जे.पी. गावित यांनीही उमेदवारी अर्ज नेला आहे. याआधीही त्यांनी स्वताची उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे दिंडोरी मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -