घरमहाराष्ट्रनाशिकउच्च शिक्षणासाठी जाणार्‍या ४९७ विद्यार्थ्यांचे लसीकरण

उच्च शिक्षणासाठी जाणार्‍या ४९७ विद्यार्थ्यांचे लसीकरण

Subscribe

महात्मा फुले कलादालनात लसीकरण सुरु

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यापूर्वी कोरोनावरील लस देणे गरजेचे आहे. शहरात अशा ४९७ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

जगभरात कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. देशाबाहेर शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी महाकवी कालिदास कलामंदिराशेजारील महात्मा फुले कलादालनात हे लसीकरण केले जात आहे. अमेरिका, युरोप व इतर बहुसंख्य देशांमध्ये कोविशील्ड ही लस मान्यताप्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कोविशील्ड लस देण्यात येत आहे. केवळ लसीकरणाअभावी नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे व व्यवसायिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

गुरुवारीही लसीकरण

ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण राहिले असेल त्या विद्यार्थ्यांसाठी व परदेशात व्यवसायानिमित्त जाणार्‍या नागरिकांसाठी शालीमार येथील महात्मा फुले कलादालनात दर गुरुवारी लस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तरी परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व व्यवसायानिमित्त परदेशात जाणार्‍या नागरिकांनी सोमवार ते शनिवार या दिवशी लसीकरण करण्यासाठी नावनोंदणी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक कागदपत्रे धरणार ग्राह्य

लसीकरणासाठी विद्यार्थ्यांनी आय २० किंवा डीएस -१६० फॉर्म, प्रवेश निश्चित झालेचे पत्र व आयकार्ड, पासपोर्ट परवानासोबत आणावेत. तसेच व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी निगडित कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येईल, असे महापालिकेने कळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -