घरमहाराष्ट्रनाशिकनिफाडच्या २६ गावांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

निफाडच्या २६ गावांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

Subscribe

आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नांना यश

निफाड तालुक्यातील 26 गावांसाठी शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला. निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे तुकाराम महाराज मंदिर सभामंडपासाठी वीस लक्ष रुपये, चापडगाव येथे मुख्य रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, तामसवाडी येथे सभामंडपासाठी दहा लक्ष रुपये, पिंपळगाव निपाणी ते बेरवाडी रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, रसलपूर फाटा ते रसलपूर गाव या रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, रसलपूर येथे सभामंडपासाठी वीस लक्ष रुपये, रानवड येथे गावांतर्गत रस्त्यासाठी दहा लक्ष रुपये, जळगाव येथे गावांतर्गत रस्त्यासाठी दहा लक्ष रुपये, रामपूर येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामासाठी दहा लक्ष रुपये, कसबे सुकेणे येथे सभामंडपासाठी वीस लक्ष रुपये, दिक्षी येथे आदिवासी वस्ती सभामंडपासाठी पाच लक्ष रुपये, मौजे सुकेणे ते ओणे रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, लोणवाडी ते शिरवाडे वणी रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, शिरवाडे वनी ते आहेरगाव रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, पालखेड ते आहेरगाव रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, पंचकेश्वरचे देवपूर गणपती मंदिर या रस्त्यासाठी 30 लक्ष रुपये, नांदुर्डी ते निफाड या महत्त्वाच्या रस्त्यासाठी 40 लक्ष रुपये निधी आमदार अनिल कदम यांनी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत मंजूर केला आहे.

त्याचप्रमाणे ओझर शहरातील मुस्लीम कब्रस्तान कुंपणभिंतीसाठी 30 लक्ष रुपये, ओझर बाजारपेठ रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, ओझर शिवाजी चौक ते ग्रामपंचायत ओझर या रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, त्याचप्रमाणे ओझरच्या सोनेवाडी रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये, निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीसाठी वीस लक्ष रुपये, खानगावथडी येथील सभामंडपासाठी दहा लक्ष रुपये, खानगावथडी येथील सभामंडप 10 लक्ष, मुखेड येथील रस्त्यासाठी 30 लक्ष रुपये, अंतरवेली येथील नदीलगत रस्त्यासाठी 15 लक्ष रुपये, दारणासांगवी येथे स्मशानभूमी रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर केलेले आहेत. ह्या सर्व कामांना प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर प्रारंभ होणार आहे. संबंधित गावच्या नागरिकांनी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने आमदार अनिल कदम यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -