घरताज्या घडामोडीचिंताजनक : मालेगावात 37 रुग्ण पॉझिटिव्ह; पाच नवीन रुग्ण

चिंताजनक : मालेगावात 37 रुग्ण पॉझिटिव्ह; पाच नवीन रुग्ण

Subscribe

मालेगावात लॉकडाऊन असतानाही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढत आहे. मंगळवारी (दि.14) रात्री 7.30 वाजता जिल्हा रुग्णालयास रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून मालेगावातील नवीन पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दोनजण डॉक्टर व तीनजण कोरोनाबाधित रुग्णाचे नातलग आहेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. आता नाशिक जिल्ह्यात 41 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. त्यातील सर्वाधिक 37 रुग्ण मालेगावातील आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. 27 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्या रुग्णांस अवघ्या 11 दिवसांत डॉक्टरांनी बरे केले आहे. तरीही, बेशिस्त नागरिक सामाजिक अंतर ठेवत नाही, मास्क वापरत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. 8 एप्रिलपासून मालेगावात दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांचे नातलग असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मंगळवारी (दि.14) रात्री 7.30 वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालयास प्रलंबित रिपोर्ट मिळाले आहेत. त्यातील पाच रिपोर्ट मालेगावातील रुग्णांचे असून ते सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -