देवळाली गाव हल्लाप्रकरण : पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

police died of corona

देवळाली गावात दोन दिवसांपुर्वी गावगुंडांनी घराचा दरवाजा तोडून कोयत्याने हल्ला केला होता.याप्रकरणी पोलीस कर्तव्यात कसूर केल्याने उपनगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांच्या नियंत्रण कक्षात बदल्या करण्यात आल्या आहेत.

देवळाली गावातील सुंदरनगर येथे 12 जूनच्या पहाटे एका महिलेच्या घरावर गावगुंडांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी कोयते व लोखंडी राॅडने दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर महिलेचा मुलगा जनार्दन कुमावत याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत घटनास्थळी भेट दिली होती. देवळाली गावातील सुंदरनगर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षकासह चार कर्मचारी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल रोहकले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला.