घरमहाराष्ट्रनाशिककेंद्रीय कर्मचार्‍यांना ५० टक्के उपस्थिती

केंद्रीय कर्मचार्‍यांना ५० टक्के उपस्थिती

Subscribe

श्रीधर गायधनी ,नाशिकरोड : 

देशभरात ओमायक्रॉनचा शिरकाव होऊन कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारितील सर्व आस्थापनांना कोरोनाबाबत आपापल्या पातळीवर आदेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण मंत्रालयाचे उपसचिव उमेश कुमार भाटीया यांनी केल्याने आता राज्यात लॉकडाऊनची शक्यता अधिक वाढली आहे. यामुळे कॅन्टोंन्मेंट बोर्डासह प्रेस कामगार व रेल्वे सेवेत काही प्रमाणात प्रतिबंध येणार आहेत.

- Advertisement -

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने त्यांच्या अंतर्गत येणार्‍या देशातील सर्वच आस्थापनांना त्यांच्या पातळीवर कोरोना प्रतिबंधात्मक व उपाययोजना लागू करण्याच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. संपूर्ण देशात संरक्षण, रेल्वे, प्रेस इ. सर्वच आस्थापनांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पुढील आदेश होईपर्यंत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. अपंग व्यक्ती व गरोदर महिलांना कामाच्या ठिकाणी न बोलवता वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. आस्थापनेच्या एकूण कामगार संख्येच्या केवळ ५० टक्के कामगारांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बोलवावे, उर्वरित ५० टक्के कामगारांना शक्य झाल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय द्यावा, उच्चपदस्थ सर्व अधिकार्‍यांनी नियमित आपल्या कामावर हजर राहावे.

कार्यालयात गर्दी न करता सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० व सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत कामाचे नियोजन करावे, कंटेन्मेंट झोनमध्ये राहणार्‍या अधिकार्‍यांना कंटेन्मेंट झोन डिनोटिफाईट होईपर्यंत घरी राहण्याची सूट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाबतचे यापूर्वीच्या आदेशांचे कठोर पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचे उपसचिव उमेश कुमार भाटीया यांनी सदरचे आदेश काढले असून, ते प्रतिकेंद्रीय मंत्रालयाच्या सर्व विभागांना पाठवण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -