घरमहाराष्ट्रनाशिकएलएलबी परीक्षेत ५० टक्के विद्यार्थी नापास

एलएलबी परीक्षेत ५० टक्के विद्यार्थी नापास

Subscribe

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विधी अभ्यासक्रमासाठी (एलएलबी) फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या परीक्षेत ५० टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विधी अभ्यासक्रमासाठी (एलएलबी) फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या परीक्षेत ५० टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. परीक्षेच्या काळात विद्यापीठाने दोन पेपर परीक्षा होण्यापूर्वीच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. त्यामुळे या विषयांमध्ये बेस्ट ऑफ टू देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. पुन्हा परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मेपर्यंत होती. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थी नापास झाले असून त्यांना बेस्ट ऑफ टूचा पर्याय द्यावा. तसेच परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज विद्यापीठाच्या नाशिक विभागीय कार्यालयात निवेदन दिले. परीक्षा नियंत्रकांशी संवाद साधत दोन पेपरचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत, अर्ज भरण्यासाठी विनाविलंब शुल्क ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे. यावेळी अ‍ॅड. अजिंक्य गिते, संकेत मुठाळ, संस्कार लोढा, अजय राका, प्रतिक खरोटे, गौरव उगले, ओमकार सानप, अंकित वाघ आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

  • विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये एक दिवस सुटी मिळावी.
  • १७ ते २७ जून २०१९ या कालावधीत होणार पुन्हा परीक्षा
  • ’बेस्ट ऑफ टू’चा पर्याय दिला, पण ५० टक्के विद्यार्थी नापास
  • परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ द्या
  • अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारू नये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -