अतिवृष्टीने नाशकातील ५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्यात

नाशिक : जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५ हजार ७६५ हेक्टर शेतीक्षेत्र पाण्यात गेले. जुलै महिन्यात दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच ऑगस्ट महिन्यातील पावसाने पुन्हा एकदा शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे.

जिल्ह्यातील १२१ गावातील ७ हजार ९६९ शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला आहे. सर्वाधिक २ हजार ९ ६८ हेक्टरचे नुकसान येवला तालुक्यातील आहे.त्याखालोखाल १ हजार १३७ हेक्टरचे नुकसान बागलाण तालुक्यात झाले आहे. इतर तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे मालेगाव-६५६, नांदगाव- ४०, दिंडोरी-१२३, नाशिक -१७, सिन्नर ३७५, चांदवड- ४४५. बागलाणमधील २, तर येवला तालुक्यातील ५ अशा एकूण ७ हेक्टरवरील द्राक्षांचे आणि बागलाणमधील ५८ हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाले.

तालुकानिहाय आपत्तीग्रस्त क्षेत्र हेक्टरमध्ये

  • सिन्नर- मका -३७, टोमॅटो ८५, सोयाबीन ८५, टोमॅटो २५१, भाजीपाला २
  • येवला- मका १५४१, सोयाबीन १२५३, टोमॅटो ११९, भाजीपाला १२
  • चांदवड- मका ३७०, बाजरी ३, सोयाबीन ५२, कांदा रोपे २०
  • दिंडोरी- भात १८, भुईमुग ३५,सोयाबीन ५१, भाजीपाला २३
  • नाशिक- सोयाबीन २, भाजीपाला १५
  • मालेगाव- मका २७३, बाजरी १२२, भुईमूग ३०, कापूस २१३ , भाजीपाला १८
  • बागलाण- मका ९४९, बाजरी ११०, तुर १, भाजीपाला १७
  • नांदगाव – मका २३, कापूस १७