Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक ५१ जोडप्यांनी एकाच वेळी बांधली जन्मगाठ; वाजत-गाजत साजरा झाला सोहळा

५१ जोडप्यांनी एकाच वेळी बांधली जन्मगाठ; वाजत-गाजत साजरा झाला सोहळा

Subscribe

नाशिक : धर्मादाय आयुक्त यांच्या निर्देशाने करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात जिल्हाभरातील 51 जोडप्यांचा वाजत गाजत विवाह लावून देण्यात आला. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने झालेल्या या सोहळ्यात नवविवाहित दांपत्यांना जीवनउपयोगी संसार साहित्याचेही वाटप करण्यात आले .

विवाह सोहळा अलीकडच्या काळात खर्चिक बनल्याने सामुदायिक विवाह करून खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने तसेच सामाजिक कर्तव्य म्हणून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे महाराष्ट्र दिनी 51 जोडप्यांच्या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

या सोहळ्यात नाशिक बरोबरच पेठ सुरगाणा त्रंबकेश्वर यासह अन्य तालुक्यांमधील जोडपे सहभागी झाले होते. श्री स्वामी समर्थ परिवारातर्फे विवाहासाठीचा मंडप तसेच धार्मिक विधीची व्यवस्था करण्यात आली होती. चंद्रकांत मोरे यांनी यावेळी उपस्थिताना आशीर्वाद दिले. गुरुगोविंद सिंग पब्लिक स्कूल येथे झालेल्या या सोहळ्यात धर्मादाय सह आयुक्त टी. अकाली, उपायुक्त के. एस. सुपाते, सहाय्यक आयुक्त राम लिप्ते सहाय्यक आयुक्त एस एस खरोशे, बलवीर सिंग छाब्रा, नरेंद्र पगराणी, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते. समितीचे समन्वयक अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी प्रास्ताविक केले.

समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समितीचे पदाधिकारी अ‍ॅड. संध्या डहाके, सुनील चोपडा, मंजुषा गुर्जर, अजमल खान, अशोक नेहे, सिकंदर सय्यद, पद्मनाभ कुलकर्णी तप्ती धारणे, जयश्री चौधरी आदींनी विवाह सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. मध्यमा भानोसे यांनी सूत्रसंचालन केले. विवाह सोहळ्यात आदिवासी जोडप्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या रिवाजाप्रमाणे धार्मिक विधी करण्यात आले. सामाजिक कर्तव्य म्हणून केलेल्या या सोहळ्यात आदिवासी दांपत्यांचे पालक भारावून गेले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -