घरताज्या घडामोडीधक्कादायक ! दिवसभरात तब्बल ५१० कोरोनाबळींची नोंद

धक्कादायक ! दिवसभरात तब्बल ५१० कोरोनाबळींची नोंद

Subscribe

आयसीएमआरच्या पोर्टलवर मृत रुग्णांची आकडेवारी अपलोड होण्याचे सत्र १० जूनपासून सुरुच आहे. पाच महिन्यांपासून आयसीएमआर पोर्टलवर अपलोड होऊ न शकलेले मृत्यू खासगी हॉस्पिटलव्दारे आता अपलोड केले जात आहेत. त्यामुळे १० जूनपासून उच्चांकी मृत्यूचे आकडे समोर येऊ लागले आहेत. रविवारी (दि.१३) उच्चांकी 510 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक शहर १२२, नाशिक ग्रामीण ३८४ आणि मालेगावमधील चार जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २४ तासांत अवघ्या ५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात नाशिक शहर ३ आणि नाशिक ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे.

जिल्ह्यात दिवसभरात ५९२ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर १२२, नाशिक ग्रामीण ४३३, मालेगाव २९ आणि जिल्ह्याबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ६ हजार ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण ३ लाख ९१ हजार ३४१ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ३ लाख ८० हजार ६११ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात ४ हजार ३०० सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहर १ हजार ७४९, नाशिक ग्रामीण २ हजार ४०५, मालेगाव १३८ आणि जिल्ह्याबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. सुदैवाने जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -