Corona : दिवसभरात ५६५ नवे रुग्ण; ८७३ कोरोनामुक्त

corona vaccine

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होवू लागली असून, सोमवारी (दि.२६) ५६५ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण २३७, नाशिक शहर ३१५, मालेगाव ११ आणि जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिवसभरात ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या ५ हजार ६९२ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये २ हजार ७६६ आणि नाशिक शहरातील २ हजार ७४४ रुग्ण आहेत.

जिल्ह्यात दिवसभरात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ४, ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यात ९२ हजार २५६ रुग्ण बाधित आढळून आले असले तरी ८४ हजार ९२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २३ हजार ११, नाशिक शहर ५७ हजार ४९४, मालेगाव ३ हजार ८४८ आणि जिल्ह्याबाहेरील ५६८ रुग्णांचा समावेश आहे.