नाशिक शहरात 60 नवे रुग्ण पॉझिटिव्ह

India reports the highest single-day spike of 14516 new COVID19 cases and 375 deaths in last 24 hours
नाशिक जिल्ह्यात व नाशिक शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा 2 हजाराच्या नजीक पोहचला आहे. रविवारी (दि.14) जिल्ह्यात 93 नवे आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 60 व नाशिक ग्रामीणमधील 33 रुग्णांचा समावेश आहे.  दिवसभरात शहरात दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 973 बाधित रुग्ण असून नाशिक शहरात 678 रुग्ण बाधित आहेत.
शहरातील नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
खुटवडनगर, कामठवाडे येथील ४६ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. वडाळागाव येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व  कुटुंबातील ५८ वर्षीय महिला कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शिवकृपा हॉस्पिटल, हिरावाडी, पंचवटी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पखाल रोड येथील ७ वर्षाची मुलगी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. भाभानगर येथील ३१ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. गुरुद्वारा रोड येथील ९ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाथर्डी फाटा येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वडाळा येथील ६० वर्षीय  वृद्ध पुरुष कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ७६ वर्षीय वृद्ध बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पखाल रोड येथील ३० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौक मंडई, नाशिक येथील  ६७ वर्षीय पुरुष ११ जून २०२० रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा मृत्यू झाला असून ही व्यक्ती बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.