घरमहाराष्ट्रनाशिकनुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत ६२ कोटी

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत ६२ कोटी

Subscribe

जिल्हयात ३४ हजार हेक्टर क्षेत्राला फटका, ६५ हजार शेतकरी बाधित

जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांसह उस, कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अंतिम अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून या अहवालानूसार जिल्ह्यात १३१६ गावांमधील ३४ हजार ९५२ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी ६२ कोटी ५४ लाख ९० हजार रूपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

अरबी समुद्रामधील कमीदाबाच्या पट्यामुळे २६ व २७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याला वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. या पावसामध्ये जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागांसह कांदा, भातशेती, टोमॅटो, गहू व अन्य पिके डोळ्यादेखत कोलमडून पडल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहे. राज्याचे मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला आठवडाभराच्या आत नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने बुधवारी अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

या अहवालानूसार जिल्हयात १३१६५ गावांना अवकाळीचा तडाखा असला असून ६५ हजार ८४९ शेतकरी बाधित झाले आहे. राज्यात नाशिक जिल्हयात सर्वाधिक नुकसान झाले असून ३४ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाली. नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्र्यांचे दौरेही झाले. हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विरोधकांनी केली. तर एनडीआरएफच्या निकषात बदल करून मदत देण्याची मागणी सत्ताधारी गटाने केली आहे. शासना निर्देशानूसार प्रशासनाने ३३ टक्क्यांवरील नुकसानीचे पंचनामे केले असून यासाठी कोरवाडहू क्षेत्रसाठी ८५०० रूपये, बागायत क्षेत्रासाठी १७ हजार रूपये तर फळपिकांसाठी २२ हजार ५०० रूपये हेक्टर प्रमाणे मूल्यांकन करून अंतिम अहवाल सादर केला आहे. सदरचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

कोरडवाहू क्षेत्र ५७९०.२३ हेक्टर
बागायत क्षेत्र १४५२३.५९ हेक्टर
बहु वार्षिक फळपिके १४६३८.२१ हेक्टर

- Advertisement -

पिकनिहाय असे आहे नुकसान
कांदा ११,५३५.२८ हेक्टर
द्राक्ष १४,३८०.४४ हेक्टर
भात ४६७७.९३ हेक्टर
गहू ११११.२२ हेक्टर
टोमॅटो २९८.१० हेक्टर
भाजीपाला ८६६ हेक्टर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -