घरमहाराष्ट्रनाशिकदेवदर्शनासाठी निघालेल्या आजीबाई विहिरीत पडूनही बचावल्या

देवदर्शनासाठी निघालेल्या आजीबाई विहिरीत पडूनही बचावल्या

Subscribe

लासलगाव भागातील घटना, ७३ वर्षीय आजीबाईंना महिलांनी वाचवले

लासलगावच्या करंजी खुर्द येथे महिला दिव्या अडसरे व तरूणांच्या सतर्कतेमुळे विहिरीत पडलेल्या सीताबाई निंबाळकर (७३) या वृद्ध महिलेस जीवदान मिळाले.

करंजी खुर्द गावापासून साधारण एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या दशरथ तासकर यांच्या गट नंबर १५६ मध्ये म्हसोबा देवस्थानाच्या दर्शनासाठी सीताबाई रामचंद्र निंबाळकर (७३) या वृद्ध आजी शुक्रवारी गेल्या होत्या. मात्र, गुरुवारी परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने शेतात काही काम नसल्याने आजूबाजूला कोणी नव्हते. परंतु येथूनच जवळ काही फुटावर शेतात महिला कांदे निंदनी करत होत्या. जवळच काटेरी झुडपे असल्याने त्यातून काहीतरी आवाज येत असल्याने दिव्या अडसरे या महिला आवाजाच्या दिशेने गेल्या. तरी काटेरी झुडपात विहिरीमध्ये आवाज येत आहे हे लक्षात आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून बघितले तर ५० फूट खोल असलेल्या तर साधारण ३० ते ४० फूट पाणी असलेल्या विहिरीत वृद्ध महिला पाईपला धरून बसल्या असल्याचे पाहून त्यांनी आपल्या शेतात असलेल्या महिलांना हा प्रकार सांगितला.

- Advertisement -

लगेच दिव्या अडसरे या गावाच्या बाजूला असलेल्या किरण अडसरे यांच्या घरी जाऊन घडलेला प्रसंग सांगितला. तर दुसरी महिला रुपाली अडसरे यांनी मळ्यातील जवळच असलेल्या गौतम अडसरे यांना सांगितले व फोनवरून गावात माहिती दिल्याने अडसरे यांनी एक ते दीड किमी अंतरावर पळत दोर व खाट आणली. तोपर्यंत येथील युवक गौतम अडसरे व राहुल निंबाळकर यांनी विहिरीत उतरून आजीला मोटर फाऊंडेशनवर बसवून ठेवत धीर देत होते. नंतर विहिरीजवळ महिला व तरूण जमा झाल्याने त्यांनी विहिरीत दोराच्या सहाय्याने खाट सोडून या वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून वृद्ध महिलेचा जीव वाचल्याचे समाधान सर्वांच्या चेहर्‍यांवर दिसत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -