Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तीन दिवसात नाशिकमध्ये नवे ७३९ बेडस

तीन दिवसात नाशिकमध्ये नवे ७३९ बेडस

आयुक्त कैलास जाधव यांची धमाकेदार कामगिरी; सोमवारी २३५ बेडस्ची व्यवस्था

Related Story

- Advertisement -

शहर व परिसरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये नाशिक महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आय.सी.सी.यु बेडची व्यवस्था करण्यात आली. गेल्या शनिवारी (दि. २७) ५०४ बेडची व्यवस्था करण्यात आल्यानंतर सोमवारी (दि. २९) त्यामध्ये २३५ बेड वाढविण्यात आले. असे एकूण ७३९ बेडची खाजगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक रुग्णांची अडवणूक केली जात आहे. तर काही ठिकाणी नियमापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येत आहे. अनेकांना खासगी रुग्णालयाचे शुल्क परवडत नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत अमुलाग्र बदल करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांना बेडस उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य दिले आहे. गेल्या शनिवारी महापालिकेने ५०४ नव्या बेडसची व्यवस्था केली होती. सोमवारी त्यात २३५ नवीन बेडस समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने ७३९ बेडसची व्यवस्था झाल्याने बेड मिळण्याची मोठी समस्या संपुष्ठात येणार आहे.

 

- Advertisement -