नगरपंचायतींसाठी ८० टक्के मतदान; आज फैसला

आज होणार मतमोजणी

nagar panchayat election

नाशिक : जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी 8 जागांसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले असून, साडेअकरापर्यंत सरासरी 28 टक्के मतदान झाले आहे. दुसर्‍या टप्यात 20 उमेदवार मैदानात आहेत. नगरपंचायतीच्या दुसर्‍या टप्प्यात तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे देवळा येथे 4, निफाड 3, कळवण आणि दिंडोरी येथे प्रत्येक 2 जागांवर अशा एकूण 11 जागांची निवड स्थगित करून येथे सोडत काढून पुन्हा प्रक्रिया घेण्यात आली. या ठिकाणी दुसर्‍या टप्प्यात मतदान पार पडले. दिवसभरात सायंकाळपर्यंत ८० टक्के मतदान झाले. बुधवारी (दि.१९) रोजी मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मंगळवार, 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यातही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले होते. आज दुसर्‍या टप्प्यातही मतदान शांततेत सुरू आहे. सध्या थंडी थोडी कमी आहे. त्यामुळे साडेअकरापर्यंत त्या तुलनेत मतदान चांगले झाले आहे. देवळा येथे 27.58 टक्के, निफाड येथे 21.13 टक्के तर दिंडोरी येथे 41.39 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळपर्यंत देवळा येथे ८१.४५ टक्के, निफाड ७९.४४ टक्के, दिंडोरी येथे ८३.५६ टक्के मतदान झाले. सरासरी सायंकाळपर्यंत ८० टक्के मतदान झाले.

अशी होतेय लढत

जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान झाले. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे.

दिंडोरीतही रंगत

दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवणमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर निवडणुक होत आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. निफाडमध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत बघायला मिळत आहे. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होत आहे.