घरताज्या घडामोडी८२ किलो गांजा जप्त; एकाला अटक

८२ किलो गांजा जप्त; एकाला अटक

Subscribe

अंमली पदार्थावर कारवाई करण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखेस पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सूचना दिल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत एकाला अटक केली. त्याच्याकडून ८ लाख ७९ हजार ३३० रुपयांचा ८२ किलो २३३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. मोसिम अनिस शेख (२८, रा.काझीपुरा,भद्रकाली) असे अटक झालेल्याचे नाव आहे.

वडाळानाका येथील बिल्डींग क्र.३मधील दुसर्‍या मजल्यावर अंमली पदार्थांची साठवणूक केली असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांना मिळाली. दरम्यान मोसिम शेख गांजा वाहतुकीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवारी (दि.२९) रेणुकामातानगर, व्होकार्ट रुग्णालयाजवळ सापळा रचला. बिल्डींग क्र.३ मधून मोसिम शेख याला अटक केली. त्याच्याकडून ८ लाख ७९ हजार ३३० रुपयांचा ८२ किलो २३३ ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -