घरताज्या घडामोडीमालेगावात @ 94 : आणखी 9 रुग्ण पॉझिटिव्ह

मालेगावात @ 94 : आणखी 9 रुग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जिल्हा रुग्णालयास मंगळवारी रात्री 20 रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून त्यातील मालेगावातील 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मालेगावात आत्ता 94 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून आठजणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 108 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी कडक नाकाबंदी, आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनास यश येत आहे. नाशिक जिल्ह्यात संशयित 951 नागरिकांच्या घशाचे नमुने घेण्यात आले आहेत. ते पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मंगळवारी (दि.21) रात्री 20 रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास मिळाले. 11  निगेटिव्ह रिपोर्ट नाशिकमधील असूूून 09 पॉझिटिव्ह रिपोर्ट मालेगावातील आहेत. त्यात 7 पुरुष व 2 महिला आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -