घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेत 95 कर्मचारी 'लेटलतीफ'

जिल्हा परिषदेत 95 कर्मचारी ‘लेटलतीफ’

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेत बांधकाम विभागातील कर्मचारी गायत्री पवार यांची चौकशी सुरु झाल्यानंतर अधिकार्‍यांनी अचानकपणे दिलेल्या भेटीत तब्बल 95 कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळले आहे. या सर्व कर्मचार्‍यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेत सदस्य पदाधिकारी नसल्याने प्रशासकीय राज सुरू असून, यात अनेक विभागात अधिकारी, कर्मचारी भेटत नसल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारी असतानाच बांधकाम क्रमांक दोन मधील एका महिला कर्मचाजयांच्या विरोधात ठेकेदारांनी मोठया तक्रारी केल्या. या तक्रारींवरून उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास मुख्यलायातील सर्व विभागांना भेटी देत, हजेरी पत्रकांची तपासणी केली. यात अनेक कर्मचारी हजर नसल्याचे चित्र होते. अनेक कर्मचारी येत असताना दिसत होते. पिंगळे यांनी हजेरी पुस्तक जमा करून सामान्य प्रशासन विभागात आणले. विविध विभागातील सुमारे 95 कर्मचारी लेटलतिफ सापडले. यात बांधकाम विभाग क्र 2 (8), कृषी (8), आरोग्य (11), समाजकल्याण (3), पाणी पुरवठा व स्वच्छता (5), बांधकाम विभाग क्र 3 (9), बांधकाम विभाग क्र. 1 (13), समग्र शिक्षण विभाग (2), ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (7), लघुपाटबंधारे विभाग (6), प्राथमिक शिक्षण (12), माध्यमिक (3), लेखा व वित्त (2) आणि सामान्य प्रशासनविभागातील (6) कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कर्मचारी अधिकारी उशीराने येतात, भेटत नाही या तक्रारींची बनसोड यांनी गंभीर दखल घेत, सर्व अधिकारी, कर्मचाजयांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली. तसेच बायोमेट्रीक हजेरीप्रमाणेच कर्मचाजयांचे वेतन काढण्यात यावे, हजेरी नसल्यास वेतन कपात करावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. सर्व कर्मचार्‍यांना शासकीय वेळात जागेवर हजर रहावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देखील बनसोड यांनी यावेळी दिले.दरम्यान, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कर्मचारी काम असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -