Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र ३ वर्षाचा चिमुकलयाचा खेळता-खेळता तोल गेल्याने बेकरीच्या ग्रँडरमध्ये पडला, तितक्यात ग्रँडर चालू...

३ वर्षाचा चिमुकलयाचा खेळता-खेळता तोल गेल्याने बेकरीच्या ग्रँडरमध्ये पडला, तितक्यात ग्रँडर चालू झाले; अन्…

Subscribe

नाशिक : बेकरी मधील गिरणीत (ग्रँडर) अडकल्याने तीन वर्षीय चिमुकल्याची मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.२५) रात्री 9 वाजेदरम्यान इंद्रकुंड, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रिहान उमेश शर्मा (रा. हिमालय हाउस, इंद्रकुंड, पंचवटी) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रकुंड परिसरात राहणार्‍या शर्मा कुटुंबाचा बेकरीचा व्यवसाय आहे. शर्मा यांच्या राहत्या घरातच एका बाजूला बेकरीचे सर्व साहित्य व व्यवसाय आहे. या ठिकाणी रिहान गुरुवारी (दि.२५) रात्री 9 वाजता रिहान खेळत होता. त्यावेळी बेकरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी गिरणी (ग्रँडर) बंद होती. रिहान खेळता-खेळता त्या गिरणीत तोल गेल्याने पडला. तितक्यात गिरणी चालू झाल्याने तो गिरणीतील पात्यांसह बेल्टमध्ये अडकला. त्यात गंभीर जखमी झाला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून रात्री १२ वाजेदरम्यान त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पालकांनी मुलांकडे द्यावे लक्ष

- Advertisement -

नाशिक शहरात चिमुकल्या मुली व मुले खेळता-खेळता गरम पाण्याच्या बाटलीत पडल्याने, पाण्याच्या खड्ड्यात व लिफ्टच्या डक्ट पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. रिहान ज्यावेळी गिरणी अडकला त्यावेळी त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. गिरणीमध्ये तो पडल्याने अंतर्गत रक्तस्त्रावासह हाडांना धक्का बसला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पालकांसह नागरिकांनी मुलेमुली खेळत असतानाही त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -