घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात ९ वर्षीय बालिकेवर बलात्कार, ५६ वर्षीय नराधम अटकेत

नाशकात ९ वर्षीय बालिकेवर बलात्कार, ५६ वर्षीय नराधम अटकेत

Subscribe

नाशिक : नवीन नाशिक परिसरात राहणार्‍या अवघ्या नऊ वर्षीय बालिकेवर त्यांच्या शेजारीच राहणार्‍या ५६ वर्षीय नराधमाने धमकी देत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित नराधमाविरोधात पोस्कोअन्वये बलात्कार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटी) अंबड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयिताला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील (५६, रा. राणाप्रताप चौक, सिडको, नवीन नाशिक) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने अंबड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित बालिकेला वडील नाहीत. तसेच, संशयित ज्ञानेश्वर पाटील हा पीडितेच्या कुटुंबियांतील ओळखीचा असून, जवळच वास्तव्यास आहे.याच ओळखीचा आणि घरात कुणी माणून नसल्याचे पाहून संशयिताने या अल्पवयीन पीडित मुलीला रस्त्यात एकटी गाठून अडवले. तिला धमकावून अंधाराचा फायदा घेत राहत्या घराच्या पाठीमागच्या बाजूला नेले. त्याठिकाणी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच, ‘तुला वडील नाहीत. हा प्रकार तुझ्या आईला सांगितला तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन. तू पोलिसांना सांगितले तर तुझ्या घरातील सर्वांनाच संपवून टाकेल’, अशी धमकीही दिली.

- Advertisement -

२ ते ५ ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर या प्रकाराने पीडितेला त्रास होऊ लागल्याने तिच्या आईच्या लक्षात ही बाब आली. पीडितेने आईला हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून वृद्धाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरोधात पोस्को (बाल लैगिंग अत्याचार संरक्षण अधिनियम) अन्वये बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. तेव्हा त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -