नाशकात सापुतारा येथे 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी

A bus carrying over 50 passengers fell into a gorge near Saputara
नाशिक : सापुतारा येथे 50 प्रवाशांनी भरलेली बस कोसळली दरीत, 2 ठार 40 जखमी

नाशिक जिल्ह्याच्या सापुतारापासून पुढे काही अंतरावर असलेलेल्या डांगच्या घाटामध्ये अडीचशे फूट खोल दरीत बस कोसळ्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या बसमध्ये तब्बल 50 जण प्रवास करत होते. मात्र परतीचा प्रवास करत असताना अचानक ही बस दरीत कोसळ्याने या दुर्घटनेत 2 जण ठार झाले आहेत तर 40 जण जखमी झाल्याची माहीती समोर येतेय.(A bus carrying over 50 passengers fell into a gorge near Saputara)

डांग जिल्ह्यातील पंपासरोवर, शबरीधामसारख्या इतर ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची सहल गेली होती. सुरतच्या मरोली येथील एका खाजगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची ही सलह होती. मात्र यावेळी अचनाक बसचा अपघात झाला. जखमी झालेल्या 40 व्यक्तींना उपचाराकरीता सुरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ठार झालेल्या प्रवाशांमध्ये दोनही महिला असल्याचे कळतेय.

दरम्यान स्थानिक प्रशासन तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत येथील परिस्थितीवर गृह राज्यमंत्री हर्ष संघवी लक्ष ठेवून असून त्यांनी तात्काळ मदत व बचावकार्य युद्दपातळीवर सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना टायर फाटल्यामुळे झाली. तसेच इतर उर्वरीत लोकांना वाचवण्यात यश आल्याचं गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी सांगितलं आहे.


हे हि वाचा –  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू