घरमहाराष्ट्रनाशिकऔरंगाबाद रोडवर बर्निंग कारचा थरार

औरंगाबाद रोडवर बर्निंग कारचा थरार

Subscribe

पेट्रोलपंपाच्या बाहेरच चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना

नाशिक : औरंगाबाद रोडवरील ओढा येथील पेट्रोलपंपाच्या बाहेरच चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवत उडी मारल्याने तो बचावला. नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. बर्निंग कारचा थरार अनेक नागरिकांनी मोबाईलमध्ये
कैद केला.

नाशिक येथून निफाडच्या दिशेने मंगळवारी राखाडी रंगाची डस्टर कार जात होती. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर ओढा येथे इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या बाहेरच कारच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. त्यानंतर कारने अचानक पेट घेतला. कारमधून धूर येताना पाहून चालकाने प्रसंगावधान दाखवत कार रस्त्याच्या बाजूला उभी केली व बाहेर उडी घेतली.

- Advertisement -

कारने पेट घेतल्यानंतर काही क्षणातच ती जळून खाक झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारला आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काहीवेळ महामार्गावरील वाहतुकही खोळंबली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -