Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक धावत्या गाडीने अचानक घेतला पेट

धावत्या गाडीने अचानक घेतला पेट

नाशिकच्या वणीलगत असलेल्या कृष्णगाव शिवारात घडली घटना; जिवीतहानी टळली

Related Story

- Advertisement -

नाशिकहून वणीकडे जात असेलेल्या कारने कृष्णगावजवळ अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळलापरंतु गाडीपूर्णपने जळाली. नाशिक येथील स्वप्नील राजेंद्र अहेर (रा. गंगापूर रोड, नाशिक) हे नाशिक ते तिसगाव असा त्यांची गाडीने (क्रमाक एमएच-12 जेके-700) प्रवास करीत असताना नाशिक ते वणी रस्त्यालगत कृष्णगाव शिवारात गाडीचे बोनेटमधून अचानक धूर निघत असल्यामुळे त्यांनी गाडी रस्त्याचे कडेला लावून ते बाहेर निघाले. तोपर्यंत गाडीने पेट घेतला होता.

त्यांनतर पोलीस घटनास्थळी येवून वणी ग्रामपंचायत येथून पाण्याचा टक्कर बोलवून पेडती गाडी विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती विझण्याऐवजी आणखी पेट घेतला. त्यानंतर काही वेळाने नाशिक येथील अग्नीशामन दल घटना स्थळी येवून त्यांनी गाडीवर पाणी मारून गाडी विझवली. परंतू तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळाली. वणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

- Advertisement -