घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपाहिने येथे फिल्मी स्टाईल मारामारी करणाऱ्या 'त्या' तरूणांवर गुन्हा दाखल

पाहिने येथे फिल्मी स्टाईल मारामारी करणाऱ्या ‘त्या’ तरूणांवर गुन्हा दाखल

Subscribe

नाशिक : मद्यसेवन करून पहिणे धबधबा परिसरात धिंगाणा घालणार्‍या तरुणांचा व्हिडियो व्हायरल होताच वाडिवर्‍हे पोलिसांनी तपास करत या घटनेत सहभागी दिंडोरी तसेच सातपूरच्या आठ तरुणांना रात्री ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. अशा मद्यपी, अतिउत्साही तरुणांमुळे, तसेच धोकादायक ठिकाणी वावरणार्‍या हौशी पर्यटकांमुळे नाशिकमधील अनेक पर्यटनस्थळे, किल्ले या ठिकाणी पोलीस तथा वन विभागाकडून तातडीने प्रवेश बंद करण्यात आले आहेत.
वन विभागाने प्रवेश बंदी घातलेली असतानाही पावसाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी पहिणेत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मात्र, याचवेळी नेकलेस धबधब्यासमोर साचलेल्या एका ओढ्यात अंगावर पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरुन दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड गावचे तीन तरुण आणि नाशिकच्या सातपूरमधील पाच तरुणांमध्ये वाद झाला. काही वेळेतच या वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडियो सर्वत्र वेगाने व्हायरल झाला. तेव्हा या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वाडिवर्‍हे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या आठही जणांना रात्रीच ताब्यात घेत त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करत दंगा माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वाडिवर्‍हे पोलीस ठाण्याचे अंमलदार अमोल अंभोरे यांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, नरेश माणिक कजबे, गोकुळ हिरामण मोंडे, शुभम दीपक कापडणीस, राहुल प्रल्हाद गांगुर्डे (सर्व रा. सातपूर कॉलनी) आणि दुसर्‍या गटातील महेश मारुती गिदाड, रवी दिवे, विजय शिवाजी मोडे, गुलाब दिवे (सर्व रा. ओझरखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीच्या घटना, तरुण-तरुणींची हुल्लडबाजी, मद्यपींचा वावर यामुळे पहिणे अधिक चर्चेत येत असून यावर आळा घालण्यासाठी वन विभाग तसेच पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -