घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआगीत होरपळत असलेल्या पित्याने वाचवला दोन मुलांचा जीव

आगीत होरपळत असलेल्या पित्याने वाचवला दोन मुलांचा जीव

Subscribe

जखमी कृष्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

नवीन नाशिक : लाईट गेल्याने मेणबत्ती पेटवून गॅरेजमध्ये काम करत असताना मेणबत्ती खाली पडून थिनरने पेट घेतला. त्यात गॅरेजमालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंबड परिसरात घडली. विशेष म्हणजे, आगीत होरपळत असतानाही गॅरेजमालकाने मुलांना दूर करत त्यांचा जीव वाचवला. नागरिकांनी आग विझवत त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. कृष्णा राजकुमार विश्वकर्मा (वय-२९, रा. इंडोलाईन कंपनीमागे, अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा विश्वकर्मा हा बुधवारी (दि. १) रात्री आठ वाजेच्या सुमारास घराजवळील स्वतःच्या विश्वकर्मा मोटर्स गॅरेजमध्ये काम करत होता. त्यावेळी लाईट गेल्याने तो मेणबत्ती पेटवून काम करत होता. दरम्यान, मेणबत्ती खाली पडल्याने खाली गॅरेजमधील थिनरने अचानक पेट घेतला. त्यात कृष्णा विश्वकर्मा भाजून जखमी झाला. ही बाब त्याच्या दोन मुलांच्या लक्षात आली. त्यांनी वडिलांजवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही मुले आपल्याजवळ आली तर तेसुद्धा भाजतील म्हणून कृष्णा विश्वकर्मा याने दोन्ही मुलांना स्वतःपासून दूर ढकलून देत आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवली व कृष्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा शनिवारी (दि.४) सकाळी 9 वाजेदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -