औरंगाबाद रोडवर वाहिले मद्याचे पाट; ट्रक पलटी

नाशिक : औरंगाबाद रोडवर विदेशी मद्याचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे. हा ट्रक औरंगाबाद वरून मुंबईच्या दिशेने जात होता. मिर्ची हॉटेलच्या नजीक सिग्नलजवळ चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

       

दरम्यान, ट्रक मधील मद्य चोरी होऊ नये याकरता अपघाताच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी नाशिक औरंगाबाद रोडवर मद्याचे पाट वाहिल्यासारखी स्थिती झाली होती. परिसरात मद्याचा वास पसरला आहे