घरउत्तर महाराष्ट्रप्रेमप्रकरणातून पेटवले घर; प्रियकरासह दोन महिला जखमी

प्रेमप्रकरणातून पेटवले घर; प्रियकरासह दोन महिला जखमी

Subscribe

पंचवटी : प्रेमप्रकरणातून प्रियकर रिक्षाचालकाने पेट्रोल ओतून घर पेटवल्याची घटना धक्कादायक मंगळवारी (दि.१०) दुपारी १२ वाजेदरम्यान पंचवटीतील शिंदे नगरमधील भाविक बिलाजियो सोसायटीत घडली. या घटनेत रिक्षाचालक व दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या असून, आगीमुळे घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पंचवटीत पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिंदे नगर परिसरातील भाविक बिलाजियो या इमारतीत गौड कुटुंबिय राहतात. मंगळवारी (दि. १०) सकाळी त्यांच्या घरी ५५ वर्षीय मावशी आली. घरात गौड कुटुंबातील वयोवृद्ध महिला, पती, ५५ वर्षीय बहीण, दोन मुले होते. त्यावेळी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ओळखीचा रिक्षाचालक कुमावत दोन पेट्रोलच्या बाटल्या हातात घेऊन आला. त्याने घरात घुसून थेट महिलेला मारहाण केली. त्याने बाटल्यांमधील पेट्रोल घरात ओतत आग लावून फरार झाला. घरात झालेल्या भांडणाचा आवाज आणि आग पाहून मुलाने बेडरूमचा दरवाजा लावून घेत वडिलांना आणि आईला कॉल करुन माहिती दिली. या घटनेत दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या. घराला लागलेली आग बघून शेजारील नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना कॉल करून माहिती दिली. आग इतकी भयानक होती की, घरातील सिलिंग फॅनसह भिंतीचे आणि छताचे प्लास्टर निखळून पडले. गॅलरीला लावण्यात आलेल्या काचा उष्णतेमुळे फुटल्या, तर टीव्हीचीही राख झाली. अन्य वस्तूंचीही राखरांगोळी झाली. सुदैवाने या घटनेत वयोवृद्ध व्यक्ती व त्यांचा नातू प्रसंगावधानामुळे वाचला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, अशोक साखरे, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -