घरमहाराष्ट्रनाशिकजेलरोड परिसरात मोटारसायकल जाळली

जेलरोड परिसरात मोटारसायकल जाळली

Subscribe

नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारसायकल अनोळखी व्यक्तीने जाळल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी साईनाथनगर, कॅनॉलरोड, जेलरोड येथे घडली. याप्रकरणी रोहिणी प्रविण कुमावत यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी कुमावत यांनी मोटारसायकल घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्या घरात झोपेलेल्या असताना अनोळखी व्यक्तीने त्यांची मोटारसायकल जाळली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. शेळके करत आहेत.

सौभाग्यलेण्यावर चोरट्याने मारला डल्ला

वॉकिंग करणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावल्याची घटना गुरुवारी (दि.१७) सकाळी ६.३५ वाजेदरम्यान तुषार मेडिकलजवळ, रवीशंकर मार्ग येथे घडली. याप्ररणी मेघा भालचंद्र देव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा देव रवीशंकर मार्गावर वॉकिंग करत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरुन एकजण त्यांच्याजवळ आला. काही कळण्याच्या आतच चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. त्यांनी आरडाओरडा केली असता चोरटा मोटारसायकलवरुन फरार झाला.

- Advertisement -

किरकोळ कारणातून एकाला मारहाण

किरकोळ कारणातून दोनजणांनी एकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना बजरंगवाडी येथे घडली. याप्रकरणी विजय दत्ताराम चारोस्कर यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुमन रमेश शिंगाडे (३७, सर्वजण रा. मखमलाबाद), अर्जुन डंबाळे (३०), राजू लहामगे (३५) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चारोस्कर यांनी सुमन शिंगाडे यांच्या घराचा पडदा वर केला. त्यातून राग अनावर झाल्याने अर्जुन डंबाळे व राजू लहामगे यांनी चारोस्कर यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. दरम्यान, परिसरातील नागरिक मध्यस्थी झाले असता त्यांना संशयितांनी शिवीगाळ व मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. आर. जाधव करत आहेत.

- Advertisement -

जुन्या भांडणातून एकाला मारहाण

जुन्या भांडणातून चारजणांनी एकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.१७) सकाळी ८ वाजेदरम्यान जगतापमळा, मखमलाबाद रोड येथे घडली. याप्रकरणी दीपक अंबादास लहामगे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित अक्षय सुरेश पाटील (२५, सर्वजण रा. रामनगर, हनुमानवाडी), अमोल कैलास काळे (२४), निलेश ओमप्रकाश जयस्वाल (१६, दोघेही रा.रामनगर, मोरेमळा, हनुमानवाडी), अविनाश संतोष सहाणी (१७) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक लहामगे व त्यांचा भाऊ मच्छिंद्र अंबादास लहामगे जेवण करुन घराजवळ फेरफटाका मारत होते. त्यावेळी दोन मोटारसायकलवरुन चौघजण त्यांच्याजवळ आले. मागील भांडण मिटवून घ्या, असे चौघांनी त्यांना सांगितले. त्या भांडणाशी माझा काही संबंध नाही, असे दीपक लहामगे यांनी चौघांना सांगितले. राग अनावर झाल्याने अमोल काळे याने दीपक लहामगे यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पठाडे करत आहेत.

पंचवटीत मोटारसायकल लंपास

वाहनमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने मोटारसायकल लंपास केल्याची घटना जगतापमळा, मखमलाबाद रोड, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी सोमनाथ बाजीराव गायकवाड यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ गायकवाड यांनी मोटारसायकल शिक्षक कॉलनीत पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने मोटारसायकल लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता त्यांना मोटारसायकल लंपास झाल्याची दिसून झाली. पुढील तपास पोलीस नाईक गांगुर्डे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -