घरमहाराष्ट्रनाशिकचोरटी गोमांस वाहतूक करणारी पीकअप बोरटेंभे येथे उलटली

चोरटी गोमांस वाहतूक करणारी पीकअप बोरटेंभे येथे उलटली

Subscribe

स्थानिक घोटी पोलीस हेतुपुरस्सर डोळेझाक करत असल्याचे बोलले जात आहे

इगतपुरी जवळील बोरटेंभे परिसरात नाशिककडून मुंबईकडे जात असताना दर्शनी भागात भाजीपाला रचून आतील बाजूने गोमांस घेवून जाणारी पिकअप दि. १९ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान एक्सेल तुटल्याने पलटी झाली. मुंबईला सर्रासपणे गोमांस वाहतूक सुरू असून गोवंश संरक्षक कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून घोटी – इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने गाड्या तपासल्या जात नाहीत. नियमित तपासणी मोहीम राबविल्यास गोमांस वाहतुकीला आळा बसेल अशी मागणी गोवंश सरंक्षक कार्यकर्त्याच्या वतीने केली जात आहे. या अपघातामुळे मुंबईला व नाशिकला जाणारी वाहतुक सुमारे एक तास ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच इगतपुरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने पिकअप काढायचे काम चालू केले. यावेळी तासभर वाहतूक खंडित झाली होती ती वाहतुक पोलीसांनी पुर्ववत केली.

केंद्र व राज्य शासनाकडुन गोवंश हत्याबंदी घालण्यात आली असतानाही सर्रासपणे सर्वत्रच चालू असताना दिसत आहे. या बाबतीत वरदहस्त कुणाचा हा विषय सध्या चर्चीला जात आहे. राज्यात ठिकठिकाणी चोरी छुपे गोवंश हत्या केली जाते. यात मालेगाव, चाळीसगांव, संगमनेर, नाशिक, अश्या कित्येक ठिकाणहुन हे मांस मुंबईकडे पाठवीले जाते. महामार्गावरून दररोज शेकडो गाड्या जात असल्याचा अंदाज स्थानिकांनकडून व्यक्त केले जात आहे. घोटी टोलनाका परिसरातून दररोज या गाड्या जात असल्याचे स्थानिक नागरिकांच्याकडून वर्तविल्या जात आहे.

- Advertisement -

त्यावर स्थानिक घोटी पोलीस हेतुपुरस्सर डोळेझाक करत असल्याचे बोलले जात आहे. सदर पलटी झालेल्या पिकअपमध्ये बाहेरील बाजूने भाजीपाला रचलेला होता. आतील बाजूने गोमांस भरलेले होते. गाडी पलटी झाली कारणाने लक्षात आले अन्यथा दैनंदिन शेकडो गाड्यांप्रमाणे ही गाडी सुद्धा निघून गेली असती.

त्याचाच एक प्रत्यय काल बघायला मिळाला काल सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पिकअप क्र. एम. एच. ०३ पी. पी. ३३९७ मधुन तीन ते चार टन गोमांस भरलेली मुंबईच्या दिशेने जात असताना बोरटेंभा शिवारात टेम्पोचे मागील चाकाचे एक्सेल तुटल्याने चाक निखळले व टेम्पो एका शेतात पलटी झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही चालक मात्र फरार झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, या गोमांस भरलेल्या पिकअप शेतातून बाहेर काढण्यासाठी दोन क्रेनचा वापर करण्यात आला असून यावेळी वाहतूक बंद केल्याने एक किलो मीटर पर्यंत वाहानांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेचा पंचनामा करून टेम्पो चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालकाचा शोध घेतला जात आहे. याबाबत पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, एस. के. शिंदे, पोलीस हवालदार मुकेश महिरे, सचिन देसले आदी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -