घरमहाराष्ट्रनाशिकशहरावर आता तिसर्‍या डोळयाची नजर; 'सीसीटीव्ही'साठी मुख्यमंत्रयांकडून १५ कोटी मंजूर

शहरावर आता तिसर्‍या डोळयाची नजर; ‘सीसीटीव्ही’साठी मुख्यमंत्रयांकडून १५ कोटी मंजूर

Subscribe

मूलभूत सुविधा योजनेतून

नाशिक : शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा किंबहुना गुन्ह्यांचे प्रमाण अतिअल्प व्हावे म्हणून अवघे शहर सी.सी.टी.व्ही.च्या कक्षेत असावेत यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना आता यश आले. गोडसे यांच्या सततच्या पाठपुरामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या मूलभूत सुविधांचा विकास योजनेतून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून अवघ्या शहरात शेकडो सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येणार आहेत.तर काही ठिकाणी इतर विकास कामे करण्यात येणार आहेत.शहरात सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येणार असल्याने शहरवासियांची सुरक्षा मजबूत होणार असून गुन्हेगारांवर निश्चितच मोठ्या प्रमाणावर आळा बसन्यास मदत होणार आहे.

शहरवासीयांकडून सुरक्षेविषयी आलेल्या मागणीची गंभीर दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी शहरभर सी.सी.टि.व्ही बसविण्याकामी निधी मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीतही सी.सी.टी.व्ही बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात होता. यावेळी शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी तात्काळ सी.सी.टी.व्ही. करिता निधि उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करण्यात आली होती.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत शहरात सी.सी.टी.व्ही यांचा बसविण्यासाठी पंधरा कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात सी.सी.टी.व्ही बसविण्यात येणार असून काही विकासकामेही करण्यात येणार आहे. या सी.सी.टी.व्ही. मुळे पोलीस प्रशासनाचाही कामाचा भार काही अंशी कमी होणारा असून शहराची सुरक्षा मजबूत होणार आहे. सी.सी.टी.व्ही.मुळे आता अवघ्या शहरावर तिसर्‍या डोळ्याची नजर असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -